गोविंदा करणार शिवसेनेत प्रवेश? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट 'या' मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!

22 Mar 2024 13:59:05
 govinda
 
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा राजकारणात पुन्हा एंट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे. गोविंदा यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेतली असल्याची माहीती आहे. त्यामुळे माजी खासदार गोविंदा राजकारणात पुनरामन करणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे गोविंदा शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्यांना शिवसेनेकडुन लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे असं बोललं जात आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातुन शिवसेना गोविंदा यांना मैदानात उतरवणार असल्याची चर्चा रंगली आहे.
 
 हे वाचलत का ? - गेम झाला! वसंत तात्यांचं पुढचं पाऊल ठरलं!
 
या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाने विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना गोविंदा यांना उभा करु शकते असे बोलले जात आहे. ह्या जागेवर शिवसेनेचेच गजानन किर्तीकर खासदार आहेत. पण उबाठा गटाने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने ही जागा भाजपला जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
 
त्यामुळे जरी गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरीही त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातुन उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. पण मुख्यमंत्र्यांती भेट घेतल्याने ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
गोविंदा हे यापुर्वी मुंबइमधुन खासदार म्हणुन निवडुण गेले आहेत.
 
 हे वाचलत का ? - काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची घोषणा!
 
याआधी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदा यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातुन काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती. ज्यावेळी त्यांनी भाजपचे राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे एक सुप्रसिद्ध चेहरा आणि राजकारणाची समज असलेल्या या अभिनेत्याला महायुती उमेदवारी देऊ शकेल असं बोललं जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0