धंगेकर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? वसंत मोरेंचं काय?

21 Mar 2024 17:10:20

Ravindra Dhangekar & Vasant More 
 
 
पुणे : लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वच पक्ष जागावाटपाच्या कामाला लागले आहेत. यातच आता पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, महायूतीकडून मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
 
राज्यात महायूती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष रंगणार आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या बैठकांचे सत्र सुरुच आहे. यातच आता पुणे लोकसभेसाठी महायूतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  मराठवाडा हादरला! नांदेड, हिंगोली आणि परभणीत भुकंपाचे धक्के
 
दुसरीकडे, नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले वसंत मोरे हेदेखील पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. याबाबत त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यामुळे वसंत मोरे मविआकडून पुणे लोकसभा लढवतील अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांचे नाव पुण्यासाठी निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. पण वसंत मोरे हे पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता वसंत मोरेंचं काय? आणि ते पुढील भूमिका काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0