मराठवाडा हादरला! नांदेड, हिंगोली आणि परभणीत भुकंपाचे धक्के
21-Mar-2024
Total Views | 151
नांदेड : मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसर हादरला आहे. या तिन्ही ठिकाणी गुरुवारी सकाळी ६ वाजून ९ मिनीटांच्या दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप ४.२ रिश्टर स्केल तीव्र असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांच्या आसपास नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले. दरम्यान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातील भींतींना भेगा गेल्याही माहितीही पुढे आली आहे. याआधीही याठिकाणी मार्चच्या सुरुवातीला भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.