मनसे आणि महायूतीत खलबतं! राज ठाकरेंनी घेतली शिंदे-फडणवीसांची भेट

21 Mar 2024 13:04:13
 
Shinde-Fadanvis & Raj Thackeray
 
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून मनसे महायूतीत सहभागी होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. या बैठकीत जागावाटपाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. या बैठकीत मनसे महायूतीत सहभागी होण्याबद्दल चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता राज ठाकरेंनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.
 
हे वाचलंत का? -  "ठाकरेंनी भाजपशी युती करु नये यासाठी राऊतांना काँग्रेसकडून सुपारी!"
 
वांद्रे येथील हॉटेल ताज लँडमध्ये ही बैठक पार पडली असून त्यांच्यात जवळपास दीड तास चर्चा पार पडली. दरम्यान, आता राज ठाकरे त्यांच्या पदाधिकांऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच मनसे महायूतीत सहभागी होण्याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
 
 

 
Powered By Sangraha 9.0