‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’च्या माध्यमांतरावर आनंद इंगळे म्हणतात...

Total Views |
‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून कलाकृतींच्या माध्यमांतरावर आनंद इंगळे य़ांनी आपले मत व्यक्त केले.
 

anand ingale 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : विवेक बेळे लिखित आणि अजित भूरे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ (Alibaba Ani Chalishitale Chor) या नाटकाला आता मोठे स्वरुप मिळाले असून दिग्दर्शक आदित्य इंगळे मोठ्या पडद्यावर ७ मित्रांची कथा सांगण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर बद्दल एक महत्वाची बाब म्हणजे अभिनेते आनंद इंगळे (Anand Ingale) नाटक आणि चित्रपट या दोन्ही कलाकृतींचा भाग होते. या चित्रपटाच्या निमित्ताने महाएमटीबीशी संवाद साधताना त्यांनी नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला.
 
आनंद इंगळे म्हणाले की,“ ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ हे विवेक बेळे यांनी लिहिलेले नाटक चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे. मी नाटकाचा देखील भाग होतो आणि चित्रपटाचाही भाग असल्यामुळे मला कथेचा ग्राफ माहित आहे. पण नाटकाचे जेव्हा चित्रपटात रुपांतर होते त्यावेळी प्रत्येक माध्यमाचे जे बलस्थान असते त्याचा योग्य वापर करुन घेण्याची ताकद दिग्दर्शकात असली पाहिजे. आणि ते आदित्य इंगळे यांनी अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या नाटकातून पुरेपुर सिद्ध केले आहे. नाटकाचं वेगळं बलस्थान आहे. ज्यावेळी व्यावसायिक नाटक म्हणून अलीबाबा आणि चाळीशीतले चोरचा प्रयोग सुरु होता त्यावेळी माझा सलग ४० मिनिटांचा फोनवर संवाद होता. आणि तोच सीन चित्रपटात फार वेगळ्या पद्धतीने दाखवला गेला आहे”, असे आनंद इंगळे म्हणाले. तर प्रेक्षकांना चित्रपट पाहताना नाटक पाहिल्यासारखे नक्कीच वाटणार नाही असे ठामपणे अतुल परचुरे यांनी म्हटले.
 
दरम्यान, ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ हा चित्रपट २९ मार्च रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अतुल परचुरे, मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.