हैदराबाद ही 'खतरनाक जागा' आहे, लोक दगडफेक करतात, ओवैसींच्या मतदारसंघातील वास्तव!

20 Mar 2024 16:45:27
 madhavi-lata-the-bjp-candidate-from-hyderabad
 


नवी दिल्ली :      'हैदराबाद ही खतरनाक जागा असून येथील लोक दगडफेक करतात', असा धक्कादायक आरोप भाजप उमेदवार माधवी लता यांनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या, गेली ८ वर्षे मुस्लिम वस्तीत काम केले असून भाजपकडून मला लोकसभा उमेदवारी मिळाली आहे. परंतु, येथील लोक मला प्रचार करू देत नाहीत, असा गंभीर आरोप माधवी लता यांनी केला आहे.

माधवी लता पुढे म्हणाल्या, हैदराबादची लोकसभेची जागा खूप धोकादायक असून इथल्या ५० टक्के भागात तुम्ही निवडणुकीच्या वेळी प्रचार करू शकत नाही, तुम्ही तिथे पाऊल ठेवू शकत नाही असे सांगतानाच येथील लोक दगडफेक करून डोकी फोडतात अशा परिस्थितीत मी येथे प्रचारकामाला जात आहे, असेही भाजप नेत्या माधवी लता यांनी म्हटले आहे.


हे वाचलंत का? -   'युपीमध्ये मारेकरी साजिद-जावेदच्या आईने केले एन्काऊंटर समर्थन, म्हणाल्या...' वाचा सविस्तर
 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. माधवीने प्रसारमाध्यमांशी बोलताना हैदराबाद लोकसभा मतदारसंघ धोकादायक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, येथे प्रचार करणे इतके अवघड आहे की तुम्ही मतदारसंघातील ५० टक्के भागात जाऊदेखील शकत नाही.

आपण गेल्या ८ वर्षांपासून त्या मुस्लिम वस्त्यांमध्ये काम करत असून तेव्हा मला कोणीही काही केले नाही. हा सामान्य मुस्लिमांचा विषय नाही. मूठभर स्वार्थी राजकारण्यांचे हे काम आहे, असा आरोपदेखील विरोधकांवर केला आहे. उद्या मी त्याच भागात प्रचारासाठी जाईन तेव्हा मला कोण अडवते ते बघेन. मला कोणी अडवले तर तो एकमेव पक्ष असेल, असा अप्रत्यक्ष इशाराही एमआयएमला दिला आहे.





Powered By Sangraha 9.0