'ती' बातमी खोटी! मी माघार..."; विजय शिवतारेंचं स्पष्टीकरण

19 Mar 2024 13:20:59
 
Vijay Shivtare
 
मुंबई : काही वृत्तवाहिन्या मी माघार घेतल्याची बातमी प्रसारित करीत असून ती बातमी खोटी असल्याचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी म्हटले आहे. विजय शिवतारेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत बारामतीतून निवडणूक लढवण्याबाबतच्या बातमीवर स्पष्टीकरण दिले आहे.
 
 
 
विजय शिवतारेंनी अजित पवार आणि शरद पवारांविरोधात दंड थोपटले असून बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. त्यानंतर सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना आपल्याला युतीधर्म पाळायचा आहे असे म्हटले. या भेटीनंतर विजय शिवतारेंनी येत्या ४ ते ५ दिवसांत याबाबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर विजय शिवतारेंनी माघार घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
 
हे वाचलंत का? -  "राजसाहेब ओरिजिनल 'ठाकरे'; उद्धव ठाकरे चायनीज मॉडेल!"
 
यावर आता विजय शिवतारेंनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "काही वृत्तवाहिन्या मी माघार घेतल्याची बातमी प्रसारित करीत असल्याचे समजले. हे वृत्त पूर्णतः खोटे असून मी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेसोबत चर्चा करूनच निर्णय घेईल असे मी मुख्यमंत्री महोदयांना कळवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, मी बिलकुल माघार घेतलेली नाही. तरी संबंधित वृत्त वाहिन्यांनी आपली बातमी दुरुस्त करावी," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0