"राजसाहेब ओरिजिनल 'ठाकरे'; उद्धव ठाकरे चायनीज मॉडेल!"

    19-Mar-2024
Total Views |

Raj Thackeray & Uddhav Thackeray 
 
मुंबई : राज ठाकरे हेच ओरिजिनल ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे चायनिज मॉडेल आहेत, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. राज ठाकरे हे सध्या दिल्लीमध्ये असून मनसे महायूतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता राणेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "राज ठाकरे हेच ओरिजिनल ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे चायनिज मॉडेल ठाकरे आहेत. कोणत्याही गुणामध्ये ते ओरिजिनल ठाकरे नाहीत. त्यामुळे ओरिजिनल ठाकरे ज्यांच्यामध्ये बाळासाहेबांचा प्रत्येक गुण आहे ते राज ठाकरे आमच्यासोबत येत असतील आणि त्यांच्या येण्यामुळे हिंदूत्व मजबूत होत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करु," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  राज ठाकरे दिल्लीत! मनसे महायूतीत सहभागी होणार?
 
ते पुढे म्हणाले की, "राहूल गांधींचा पायगूण भाजपसाठी शुभ आहे. ते जिथे जिथे जातील तिथे काँग्रेसचे लोक त्यांना सोडून जातात. प्रिया दत्त ही फक्त सुरुवात आहे. पुढे आणखी काय होतं ते बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात जेव्हा सभा होते तेव्हा ते बाळासाहेबांची आठवण करतात. पण शिवाजी पार्कमध्ये उभं राहून एकदाही राहूल गांधींनी बाळासाहेबांचे नाव घेतले नाही. राहूल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हिंदूद्वेशी आहे. वायनाडमध्ये ९७ टक्के मुस्लीम मतदारसंघ असल्यानेच ते तिथे निवडून येतात. त्यांनी एकदा हिंदूबहूल मतदारसंघात निवडून दाखवावं. स्वत:च्या मतदारांना खूश करण्यासाठी त्यांना हिंदूद्वेष करावा लागतो. हिंदू धर्मात शक्ती या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. त्या शक्तीला संपवण्याची भाषा राहूल गांधी करत असतील तर मोदींच्या रुपाने आम्ही त्यांना याचं चोख उत्तर देऊ," असा इशाराही त्यांनी दिला.
 
सुप्रियाताईंनी बारामतीत लक्ष द्यावं!
 
सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, "लोकसभेनंतर महाविकास आघाडीमध्ये सगळेच बेरोजगार होणार आहेत. सुप्रियाताईंनी याबद्दल थोडा विचार करावा. तसेच महायूतीमध्ये काय चाललंय याबद्दल विचार करण्यापेक्षा बारामती लोकसभेत थोडं फिरावं," असा सल्लाही त्यांनी दिला आहे.