सीएए लागू होताच विश्व हिंदू परिषदेने घेतली मोठी भूमिका!

12 Mar 2024 17:02:52
सीएए लागू होताच विश्व हिंदू परिषदेने (VHP on CAA) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले असून विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी विहिंपची भूमिका मांडली आहे.

CAA - VHP


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सोमवार, दि. ११ मार्च रोजी बहुप्रतिक्षित असलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लागू करण्यात आला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे. याबद्दल विश्व हिंदू परिषदेनेही केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले असून कायदा लागू होताच विहिंपने घेतलेल्या भूमिकेसंदभातही माहिती दिली आहे.

हे वाचलंत का? : CAA विरोधात जामिया विद्यापीठात निदर्शने!

आलोक कुमार म्हणाले की, "पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या मुस्लिम देशांमधून धार्मिक छळामुळे भारतात आश्रय घेतलेल्या निर्वासितांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे ते भारतात सन्मानाने आणि समान व्यक्ती म्हणून राहतील याची खात्री आहे. विहिंप आपल्या कार्यकर्त्यांना आणि इतर सामाजिक संस्थांना अशा निर्वासितांना भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आवाहन करते."


Powered By Sangraha 9.0