नितीन देसाई यांना ऑस्कर सोहळ्यात जगातील कलाकारांनी दिली मानवंदना

11 Mar 2024 11:25:12
कलाविश्वातील अभूचपुर्व योगदानासाठी दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना जगभरातील कलाकारांकडून ऑस्कर २०२४ या पुरस्कार सोहळ्यात आदरांजली देण्यात आली.
 

niitn desai 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांचे २ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपुर्ण कलाविश्व शोकसागरात बुडाले होते. आजवर त्यांनी मनोरंजनसृष्टीसाठी जे कलेचे योगदान दिले त्यासाठी मरणोत्तर देखील त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना थेट मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ऑस्कर (Oscar 2024) सोहळ्यात देण्यात आली आहे. ९६वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांना जगातील सर्व मान्यवर कलाकारांनी आदरांजली वाहिली. भारतीयांसाठी हा फार भावूक क्षण होता.
 
हे वाचलंत का? - सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईच्या आत्महत्येमागे ही आहेत कारणे?  
 
कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर सोहळा झाला. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, या वर्षी एकाही भारतीय चित्रपटाला जरी पुरस्कार मिळाला नसला तरी भारतीयांचे विशेष लक्ष ९६व्या ऑस्कर सोहळ्याने वेधून घेतले. दरवर्षी ऑस्कर सोहळ्यात 'मेमोरियम' या सत्रात कलाविश्वात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिवंगत कलावंतांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली जाते. यंदाच्या या ऑस्कर सोहळ्यात भारतीय कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना कलाविश्वातील योगदानासाठी मानवंदना देण्यात आली. यावेळी देसाई यांच्यसोबत फ्रेंड्स स्टार मॅथ्यू पेरी, अभिनेत्री चिता रिवेरा, अभिनेता रयान, कॉमेडियन रिचर्ड लेविस, टिना टर्नर आणि इतर कलाकारांनाही आदरांजली वाहण्यात आली.
 
 
 
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांचे भव्य सेट उभारले आहेत. यात 'लगान', 'स्लमडॉग मिलेनियर', 'हम दिल दे चुके सनम', 'बाजीराव मस्तानी', 'देवदास' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे त्यांनी कला दिग्दर्शन केले होते.
Powered By Sangraha 9.0