आणखी एका बड्या स्टारच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!

01 Mar 2024 18:20:30
अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या अभिनय पदार्पणाची गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती. आता 'महाराज' चित्रपटातून तो अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे.
 

junaid khan 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान (Amir Khan) सध्या लापता लेडिज या त्याच्या चित्रपटासाठी चर्चेत आहे. आजवर विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या आपल्या अभिनयाच्या जाळ्यात अडकवून ठेवणाऱ्या आमिरच्या मुलाने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आमिरचा मोठा मुलगा जुनैद खानचा पहिला चित्रपट ‘महाराज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
‘महाराज’ या चित्रपटाची कथा एका ऐतिहासिक महाकाव्यावर आधारित असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात जुनैद एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. आमिर खान प्रोडक्शनच्याच बॅनरखाली ‘महाराजा’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
 
आपण हे वाचलंत का? - ज्ञानवापी प्रकरण – मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी  
 
दरम्यान, अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये येण्याआधी जुनैदने सात वर्षे रंगभूमीवर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अमेरिकन अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स, लॉस एंजेलिसमधून त्याने अभिनयाचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण घेतले. दरम्यान, या पुर्वी जुनैदने आमिर खान प्रॉडक्शन निर्मित ‘प्रीतम प्यारे’ या वेब सीरिजमध्येही छोटेखानी भूमिका केली होती. दरम्यान, अभिनयासोबत जुनैद लवकरच निर्माता म्हणूनही समोर येणार असे सांगितले जात आहे. तो ‘प्रीतम प्यारे’ या चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटात आमिर खान कॅमिओ करताना दिसणार आहे. जुनैदच्या ‘महाराज’ या चित्रपटात जुनैदबरोबर साई पल्लवी, शालिनी पांडे, शरवरी वाघ आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Powered By Sangraha 9.0