ज्ञानवापी प्रकरण – मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    01-Mar-2024
Total Views |
Gyanvapi case


नवी दिल्ली:
सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मंदिर प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विरोधात अंजुमन इंतेजामिया मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.ज्ञानवापी संकुलातील मंदिराच्या नूतनीकरणाची मागणी करणाऱ्या 1991 च्या एका प्रकरणाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

19 डिसेंबर 2023 रोजी उच्च न्यायालयाने यासंबंधीच्या याचिका फेटाळल्या होत्या. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने मालकी हक्क विवाद प्रकरणांना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. अंजुमन इंतेजामिया मशीद समिती आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने या याचिका दाखल केल्या आहेत.