JNU विद्यापीठात डाव्यांची मुजोरी! ABVP च्या कार्यकर्त्यांना मारहाण

01 Mar 2024 12:35:37
 JNU
 
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (JNU) च्या कॅम्पसमध्ये डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. स्कूल ऑफ लँग्वेजेसजवळ ही घटना घडली. निवडणूक समिती सदस्य निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या असून तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी विद्यापीठाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नसून या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन्ही गटातील सदस्य गर्दीत एकत्र भांडताना दिसतात. एक व्यक्ती इकडून तिकडे सायकल फेकत आहे.
 
 हे वाचलंत का? - काँग्रेस नेत्याने पत्रकाराला केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल!
 
एबीव्हीपी सदस्यांचे म्हणणे आहे की, "भाषा विद्यालयात महासभेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर डाव्या संघटनेच्या गुंडांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. कारण त्यांना निवडणुका निष्पक्षपणे पार पडू द्यायच्या नव्हत्या. एबीव्हीपीच्या ट्विटनुसार, अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
 
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, एबीव्हीपीचे जेएनयू अध्यक्ष उमेश चंद्र अजमिरा म्हणाले, "डावे विद्यार्थी निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी करण्याचा प्रयत्न करत होते. स्कूल ऑफ लँग्वेजेसच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. ती संपूर्ण प्रक्रिया ३-४ तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. अर्ध्या तासानंतर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली तेव्हा घोष (जेएनयू अध्यक्ष) यांनी चार कम्युनिस्टांची नावे जाहीर केली आणि ते निवडून आल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी नावे आणि निवड प्रक्रिया जाहीर करण्याची मागणी केली."
 
 हे वाचलंत का? - १ कोटी घरांच्या छतावर लागणार सौर पॅनल! काय आहे, पीएम सूर्य घर योजना?
 
ते पुढे म्हणाले, “यादरम्यान दानिश (एआयएसएफ सदस्य) म्हणाले की चार नव्हे तर केवळ दोन जुने सदस्य पुन्हा निवडून आले आहेत. आयशी आणि दानिश यांनी परस्परविरोधी विधाने केली ज्यावर विद्यार्थी आक्षेप घेत होते. दरम्यान, डाव्या विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. २०० हून अधिक डाव्या विद्यार्थ्यांनी तिथे उपस्थित ४-५ कार्यकर्त्यांवर हल्ला केला. ही काही नवीन गोष्ट नाही."
 
 
Powered By Sangraha 9.0