काँग्रेसचे सहा आमदार निलंबित!

29 Feb 2024 20:23:10
6 Congress MLAs Disqualified

नवी दिल्ली
: हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. काँग्रेसच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.ज्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे त्यात धर्मशालाचे आमदार सुधीर शर्मा, सुजानपूरचे आमदार राजेंद्र राणा, कुतलाहारचे आमदार देवेंद्र भुट्टो, गाग्रेटचे आमदार चैतन्य शर्मा, लाहौल स्पितीचे आमदार रवी ठाकूर आणि बडसरचे आमदार इंद्र दत्त लखनपाल यांचा समावेश आहे.

हे ही वाचा - 
पुनश्र्च हरी ओम! नवाआरंभ करू, सुशील कुलकर्णींचा निश्चय

पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत सहा आमदारांना अपात्र ठरवले आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप पठानिया म्हणाले. राज्याचा अर्थसंकल्प मंजूर करताना हे आमदार विधानसभेत उपस्थित नव्हते. हे आमदार एका पक्षातून पक्षातून निवडणूक जिंकले होते, मात्र त्यांनी मतदान दुसऱ्याच पक्षास केले. अशाप्रकारे आयाराम - गयारामचे राजकारण योग्य नसल्याचे कायदा सांगतो. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या यापूर्वीच्या निर्णयांचा अभ्यास करून निर्णय देण्यात आला आहे, असेही विधानसभा अध्यक्ष म्हणाले.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून, हा जनभावनेच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. राज्यसभा निवडणुकीत व्हीप जारी केला जात नाही, राज्यसभा निवडणुकीत फक्त मतदान करायचे आहे, असे आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे. काँग्रेसचे सहा आमदार दोन दिवसांपासून विधानसभेच्या कामकाजात हजर आहेत. त्य़ामुळे विधानसभा अध्यक्ष केवळ काँग्रेस पक्षाचे समर्थन करत आहेत, असेही ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0