पत्रकार आणि युट्यूबवर सुशिल कुलकर्णी यांचे 'अॅनलाइझर' (sushil kulkarni analyser) हे युट्युब चॅनल गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास हॅक झाले. हा सायबर हल्ला नसून तो ठरवून केलेला कट आहे, अशी माहिती त्यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
मुंबई: कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, युट्युब चॅनल हॅक करुन खच्चीकरणाचा प्रयत्न झाला तरीही दबावाला बळी पडणार नाही. 'अॅनलाइझर डिवाइन या चॅनलच्या माध्यमातून भूमीका मांडणे सुरुच राहिल, अशी माहिती पत्रकार आणि युट्यूबवर सुशिल कुलकर्णी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. कुलकर्णी यांचे 'अॅनलाइझर' हे युट्युब चॅनल गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास हॅक झाले. हा सायबर हल्ला नसून तो ठरवून केलेला कट आहे, अशी माहिती दिली. कायदेशीर आणि इतर सर्वच लढाया पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत, असा इशाराच त्यांनी हा कट रचणाऱ्यांना दिला आहे.
ते म्हणाले, "हा कटाचा भाग असून संपूर्ण प्रकार जाणून बुजून करण्यात आला आहे. यापूर्वीही असा प्रयत्न झाला होता. त्यावेळी काही ट्रोलर्सच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता. सायबर पोलीसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या बद्दल सहकार्य करत आहेत. शिवाय गुगलकडेही या संदर्भात सातत्याने संपर्कात आहोत." हा ठरवून केलेल्या कटाचा भाग असल्याशिवाय ट्विटरसह युट्यूब हॅक करण्यात आली असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. कुलकर्णी यांनी त्यांच्या आणखी एक युट्यूब चॅनल 'अॅनलायझर डिवाईन'द्वारे त्यांच्या सबस्क्रायबर्सना याबद्दल माहिती दिली आहे. काही तांत्रिक चूका वगळता दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेला 'तो' व्हीडिओ जनतेसमोर पुन्हा आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुशील कुलकर्णींचे जीमेल अकाऊट गुरुवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हॅक करण्यात आले. त्याद्वारे युट्यूब, ट्विटर हे सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक झाले. निर्भिड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारावर झालेला हा व्यक्तीगत हल्ला त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी केला गेला, अशी चर्चा सध्या सोशल मीडियासह अन्य पत्रकारांमध्ये सुरू आहे. लाखोंच्या घरात सबस्क्रायबर्स असलेल्या या युट्यूब चॅनलच्या खात्यावर बिटकॉईन गुंतवणूक संलग्न असलेल्या एका कंपनीचे व्हीडिओ त्या अकाऊंटवर अपलोड केल्याचे दिसत आहे.