शेअर बाजार झलक : सेन्सेक्स ४८३ पूर्णांकांने वाढला, निफ्टी २१७०० पार

बीएससी मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक देखील अनुक्रमे ०.९६, ०.१८ टक्क्याने वाढला

    13-Feb-2024
Total Views |
stock market  
 
 
शेअर बाजार झलक : सेन्सेक्स ४८३ पूर्णांकांने वाढला, निफ्टी २१७०० पार 
 

बीएससी मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक देखील अनुक्रमे ०.९६, ०.१८ टक्क्याने वाढला
 

मुंबई: आज क्लोजिंग बेलनंतर सेन्सेक्स निफ्टी ट्रेडिंगमध्ये चढे निर्देशांक अखेर दिसले. इंडियन इक्विटी मार्केट आज एकूणच सकारात्मक दिसले आहे. युएस महागाई दरातील घोषणेचा आज भारतीय शेअर बाजारावर देखील परिणाम जाणवला. सेन्सेक्स ७१४०० वर गेला असन ४०० पूर्णांकांने वाढला आहे. निफ्टी २१७०० पार झाला आहे. ३.४३ अखेरीस सेन्सेक्स ४८३ पूर्णांकांने बंद झाला आहे. एकूण सेन्सेक्स मध्ये ०.६८ टक्क्याने व निफ्टी ०.५९ टक्क्याने वाढला आहे.
 
बीएससी मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक देखील अनुक्रमे ०.९६, ०.१८ टक्क्याने वाढले आहे. विशेषतः आज मार्केट मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे भागभांडवल (शेअर) ने उसळी मारली. युएस फेडरल रिझर्व्हचा परिणाम झाल्याने आज काही शेअर्सने चांगली उसळी मारली. बीएससीवरील कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ३८०.८ लाख कोटी रूपयांनी पार केले आहे. निफ्टीवर हिंदाल्को इंडस्ट्रीज, ग्रासिम इंडस्ट्रीज, डिवीजलॅब, अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्सच्या किंमती घसरल्या असून एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स तेजीत दिसले.
 
बीएससीवरील स्मॉल कॅपवर ज्युबिलेंड, आरएमएल, अजमेरा, स्टार शेअर्स वाढले असून पीटीसी, सेंट्रल बँक, मिधानी, अनुप हे शेअर्स मात्र घसरले आहेत. मिड कॅप निर्देशांक २.६ टक्क्याने घसरून एमआरएफ, व्होल्टास, क्रिसील हे शेअर्स तेजीत दिसून आयआरएफसी, युको बँक, ऑईल, आयओबी हे शेअर्स घसरले आहेत.
 
आज विशेष म्हणजे पेटीएमचा शेअर थेट ९ टक्क्याने कोसळत, रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २९५८ रूपये प्रति शेअर्सपर्यंत पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक १.३८ टक्क्याने वाढत ४५५०२ पर्यंत पोहोचला आहे. निफ्टी ५० हा १.०१ टक्क्याने वाढत ५६८९३.०५ पर्यंत पोहोचला आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.