'हलाल'च्या नावाखाली 'हराम' कमाई! एटीएसने मौलाना हबीब युसूफसह तीन जणांना ठोकल्या बेड्या

    13-Feb-2024
Total Views |
Halal Certificates
 
लखनौ : परदेशात निर्यातीसाठी तयार केलेल्या मालाशिवाय उत्तर प्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्र असलेला कोणताही माल तयार किंवा विकला जाणार नाही. खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली होती. असे असतानाही काही मौलाना उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली टोळी तयार करून व्यापाऱ्यांकडून पैसे लुबाडत होते.
 
आरोपींकडे ना कुठली लॅब होती ना त्यांनी कोणत्याही वस्तूची चाचणी केली होती, त्यांनी फक्त १०,००० रुपये घेतले आणि प्रमाणपत्र दिले. यूपी एसटीएफने प्रथम मुंबईत बसून पैसे कमावणाऱ्या मौलानाच्या चौकडीला चौकशीसाठी बोलावले आणि चौकशीदरम्यान ते पूर्णपणे उघड झाल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने दि. १२ फेब्रुवारी २०२४ सोमवारी हलाल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मौलाना हबीब युसूफ पटेल, उपाध्यक्ष मौलाना मुईदशिर सपदिहा, महासचिव मुफ्ती ताहिर झाकीर आणि कोषाध्यक्ष मोहम्मद अन्वर खान यांना अटक केली. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
 
हलाल कौन्सिल ऑफ इंडियाचे काही सदस्य हलाल प्रमाणपत्रासाठी कंपन्यांकडून मोठी रक्कम घेत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. एसटीएफने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी कंपन्यांना पैसे न दिल्यास हलाल प्रमाणपत्र देणार नाही, अशी धमकी देत होते. पोलिस उपअधीक्षक दीपक कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखालील एसटीएफच्या पथकाने चौघांना अटक केली.
 
एसटीएफने त्यांच्याकडून ४ आधार कार्ड, ४ पॅन कार्ड, ३ मोबाईल फोन, ४ एटीएम कार्ड, २१,८२० रुपयांची रोकड, तीन ड्रायव्हिंग लायसन्स, एक आरसी आणि २ मतदान ओळख पत्र जप्त केली आहेत. केवळ १० हजार रुपये घेऊन ते कोणत्याही वस्तूला 'हलाल' प्रमाणपत्र देत असत, अशी माहिती मिळाली आहे. या कमाईचा वापर ते कोणत्या कामासाठी करत होते, याचा शोध सुद्धा उत्तर प्रदेश एटीएस करत आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.