एसटी राज्य परिवहन संचालक मंडळाची ३०२ वी बैठक आज २७ ऑक्टो. रोजी होणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच चार हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. दर तीन महिन्याला ही बैठक नियमितपणे पार पडत असते. मात्र राज्यातील सत्तांतरामुळे चार महिन्याने ही बैठक पार पडणार आहे.
Read More
राज्य परिवहन मंडळाच्या सात-आठ वर्षांपूर्वीच्या बसमध्ये इंधन प्रकार बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तीन हजार बसेसमध्ये ‘एलएनजी’ (द्रव नैसर्गिक वायू) इंधन यंत्रणा बसवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० बसेसमध्ये ही सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार पुढे येतात का, हे तपासले जात आहे.