एन एस सी Q ३ निकाल : एनएससीचे एकत्रित ऑपरेटिंग उत्पन्न २५ टक्क्याने वाढले

ईअर ऑन ईअर बेसिसवर तिसऱ्या तिमाहीत ८ टक्क्यांनी नफ्यात वाढले

    12-Feb-2024
Total Views |

NSE ltd
 
 
एनएससी Q३ निकाल : एनएससीचे एकत्रित ऑपरेटिंग उत्पन्न २५ टक्क्याने वाढले
 
 
ईअर ऑन ईअर बेसिसवर तिसऱ्या तिमाहीत ८ टक्क्यांनी नफ्यात वाढले
 
 
ईअर ऑन ईअर बेसिसवर एकूण उत्पन्न ३५१७ कोटी रुपये
 
 
एनएससी ने आपल्या तिजोरीत २८१३१ कोटी रुपये जमा केले
 
 
मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएससी) या भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंजने आपल्या एकूण कामकाजातून ३५१७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याचे जाहीर केले आहे. ईअर ऑन ईअर ( वर्ष) बेसिसवर २४ च्या तिमाहीत २५ टक्क्यांचा नफा कमावला आहे. व्यवहारांच्या उत्पन्नाखेरीज, एकूण कामकाजातून ( ज्यात डेटा सेंटर, कनेक्टिव्हिटी चार्जेस, क्लिअरिंग सर्विसेस, लिस्टिंग सर्विसेस, इंडेक्स सर्विसेस, डेटा सर्विसेस, अशा विविध सेवा अंतर्भूत) एनएससी ने आपला महसूल वाढवला आहे.
 
 
आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत एनएससीने १९७५ कोटींचा नफा कमावला. वर्षाच्या आधारावर ८ टक्क्यांचा निव्वळ नफा कमावला असून, निव्वळ नफ्याचे मार्जिन तब्बल ५१ टक्क्यांनी वाढले आहे. एकत्रितपणे, प्रत्येक भागभांडवलामागे (शेअर्स) ३९ रूपयांचे उत्पन्न आर्थिक वर्ष २४ च्या तिमाहीत कमावले आहे. गेल्या २०२३ च्या तिमाहीत हे उत्पन्न,३६.९० टक्के इतके होते. रोख बाजारात (एवरेज डेली ट्रेडिंग व्हॉल्युम) ५० टक्क्याने वाढत ८०५१२ रूपये इतके उत्पन्न वाढले आहे. इक्विटी फ्युचर मध्ये १८ टक्क्याने वाढ होत ती रक्कम १३१०१० कोटींपर्यंत पोहोचली आहे. इक्विटी ऑप्श्ननमध्ये २८ टक्क्याने वाढ होत ती रक्कम ५६७०७ कोटी रुपये इतकी झाली आहे.
 
 
कॅश इक्विटी व इक्विटी डेरिएटीवमध्ये या अनुषंगाने ईअर ऑन ईअर बेसिसवर २९ टक्क्याने वाढ होत, एकूण व्यवहारावरील खर्च १८ टक्क्याने वाढला आहे. १ एप्रिल २०२३ च्या एकूण व्यवहारावरील चार्जेस मध्ये वाढ झाल्याने हे दर वाढले. एनएससीने स्वतंत्रपणे तिमाहीत २२ टक्क्याने वाढ नोंदवत आपले ऑपरेटिंग उत्पन्न ३२७० रूपये इतके वाढवलेले आहे. मागील वर्षीच्या तिमाहीत हे उत्पन्न (ईअर ऑन ईअर बेसिसवर) २६२९ कोटी इतके होते. एकूण खर्चात १६२० कोटी रुपयांने वाढ झाली असून त्यातील ५० टक्के खर्च ( एकत्रितपणे ८१० कोटी रुपये), ज्यामध्ये सेबी रेग्युलेशन फी, एसजीएफ ,आयपीएफटीवर अधिकचे योगदान यावर झाले आहेत.
 
 
गेल्या आर्थिक वर्ष २०२३- २०२४ च्या ९ महिन्यांत अधिकचे ११६७ कोटींचे उत्पन्न कोर सेटलमेंट गॅरंटी कॉर्पसमध्ये संस्थेने खर्च केले आहे. सेबीच्या निदर्शनाने सध्याच्या ५००० ते १००० कोटींच्या प्रवर्गात ११६७ कोटींची वर्गणी काढली गेली.
 
 
एनएससीच्या ईबीआयटीडीए मध्ये ५२ टक्क्याने मार्जिन वाढले आहे. गेल्या तिमाहीत हे ७३ टक्क्याने वाढले होते. एकूण ९ महिन्यांत आपल्या तिजोरीतून एसटीटी २३१३७ कोटी, इन्कमटॅक्स १४९० कोटी, स्टॅम्प ड्युटी १४५६ कोटी, जीएसटी १२५७ कोटी, सेबी फी ७९१ कोटी एवढी रक्कम खर्च केली आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.