मुंबईत एटीएसची कारवाई; ६ बांगलादेशी ताब्यात

    12-Feb-2024
Total Views |
ATS took major action arrested 6 Bangladeshis


मुंबई
: मुंबईत मानखुर्द येथे सकल हिंदू समाजातर्फे झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वाढत्या प्रमाणाबाबत मोठी माहिती समोर आली होती. रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी एटीएसच्या टीमने मुंबईमध्ये सहा बांगलादेशींवर कारवाई केल्याचे समोर येत आहे. मुंबईत येऊन अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर ही कारवाई झाली असून यात एका महिलेचाही समावेश आहे.

एटीएसच्या टीमने मुंबई पोलिसांच्या मदतीने शनिवारी वाडीबंदर येथून अमीना शेख नावाच्या एका महिलेस ताब्यात घेतले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीतून आणखी पाच जणांची नावे समोर आली. एटीएसने या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले असून त्यांची सध्या कसून चौकशी होत आहे. यापूर्वी पनवेलच्या खिदुक्पदा येथूनही दोन बांगलादेशींना भारतात अवैधपणे राहण्यावरून ताब्यात घेण्यात आले होते.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.