अशोक चव्हाणांनंतर ‘हे’ आमदारही राजीनाम्याच्या तयारीत!

    12-Feb-2024
Total Views |
Ashok Chavan to left congress

भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या!, हे विधान होतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे.खरतर लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये मागच्या महिनाभरापासून अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला रामराम केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेऊन त्यांना आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. संजय राऊतांनी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणतात की, आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का? खरतर ह्या प्रश्नाचं उत्तर चव्हाणांनी राजकीय भुमिका स्पष्ट केल्यावर मिळेल. पण त्तपुर्वी एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे एकटे जाणार नाहीत. त्यांच्यासोबत काही आमदार ही ते घेऊन जाणार. त्यामुळे आजच्या व्हिडिओत अशाच काही आमदारांबद्दल बोलणार आहोत.

विषयाची सुरुवात करण्याआधी एक गोष्ट नमुद करतो की, जे आमदार अशोक चव्हाणांसोबत जाणार असे सांगतं आहोत. ते वृत्तमाध्यमातून येणाऱ्या माहितीच्याआधारे. त्या माहितीनुसार, पहिलं नाव म्हणजे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम. कदम हे सध्या सांगली जिल्ह्यातील पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. विश्वजीत कदम हे स्वर्गीय माजी मंत्री डॉ. पंतगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. पतंगरावजी कदमांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याकडे त्यांचा कल असल्याचं सांगितले जाते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १ लाख ६२ हजारहून अधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला होता. पण अशोक चव्हाणांच्या जाण्याने मला वेदना झाल्या. पण राजकीय जीवनात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असे मत विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. तरी देखील माध्यमांमध्ये कदम अशोक चव्हाण यांच्यासोबत येणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.त्यानंतर दुसरं नाव म्हणजे, अशोक चव्हाणांच्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर. २०२१ ला काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जितेश अंतापुरकर ह्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि ते भाजपच्या सुभाष साबणेंचा पराभव करून विजयी झाले. त्यावेळी जितेश अंतापुरकर याचं तोंड भरून कौतुकदेखील चव्हाण यांनी केले होते. पण या मतदारसंघाचा इतिहास पाहता, अंतापूरकर आणि साबणे हे दोघेच एकमेकांवर मात करत या मतदारसंघावर आपले वर्चस्व राखून आहेत.

त्यानंतर तिसरे आमदार म्हणजे, नांदेडच्या हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर. माधवराव जवळगावकरांचं नाव चर्चेत येण्यामागे कारण आहे. २०१९ ची विधानसभा निवडणुक जवळगावकर यांच्या हातून २०१४ ला मतदारसंघाची धुरा निसटल्यावर पुन्हा २०१९ ला त्यांना सीट मिळणार का? हा मोठा प्रश्न होता. त्यावेळी काँग्रेसमध्येही माधवराव व गंगाधर चाभरेकर यांची नावे चर्चेत होती. पण अशोक चव्हाणांच्या शब्दामुळे जवळगावकरांना शेवटच्या क्षणी संधी देण्यात आली. ज्यामुळे आता अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने जवळगावकर चव्हाणांच्या मदतीला धावून येतील.त्यानंतर चौथं नाव म्हणजे, वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक. २०१४ ला सुभाषराव जनक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाच्या पोटनिवडणुकीसाठी अमित जनक यांना उमेदवारी मिळाली. ज्यात ते विजयी झाले. सध्या चव्हाणांसोबत जाणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये देखील अमित जनक यांचे नावे आहे. त्याबद्दल जनक म्हणाले की, असे काही ठरलेले नाही. राज्यातील राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी भूकंपावर भूकंप होत आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

 
त्यानंतर पाचवं नाव म्हणजे, अमीन पटेल. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून आमदार आहेत. खरतर अमिन पटेल हे मिलिंद देवरा यांचे समर्थक आमदार मानले जातात. देवरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर अमीन पटेल मंत्री दिपक केसरकरांसह पत्रकार परिषदेत दिसल्याने ते देखील काँग्रेसला रामराम करणार असल्यांच्या चर्चाणा उधाण आलं.त्यानंतर सहावं नाव म्हणजे, मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख. अस्लम शेख हे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात कॅबिनेट मंत्री होती. २००९ पासून ते मतदारसंघावर आपले एकहाती वर्चस्व राखून आहेत. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर येणाऱ्या शेख यांच्या राजीनामांच्या चर्चांबद्दल अस्लम शेख म्हणाले की, मी स्पष्ट करू इच्छितो की मी काँग्रेस पक्ष सोडत नाही. पण मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर अस्लम शेख यांच्या राजीनाम्याच्या चर्चांणा उधाण आलेलं आहे.मग सातवे नाव म्हणजे, अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार, सुलभा खोडके. खरतर वर्षभरापूर्वी माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर देशमुख गट आणि खोडके गट आमने-सामने आले. त्यामुळे सुलभा खोडके अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात.

त्यानंतर आठवं नाव म्हणजे, इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे हिरामण भिका खोसकर. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण त्तकालीन आमदार निर्मला गावित यांच्या पक्षांतरानंतर काँग्रेसने तिथे पाय रोवले. ज्यामुळे हिरामण भिका खोसकर हे तिथे विजयी झाले. तरी त्याचं नाव ही अशोक चव्हाणांसोबत जाणाऱ्यामध्ये घेतलं जात आहे. तसेच जी आमदार हनुमंत बेटमोगरेकर, रमेश बागवे, आमदार मोहनराव हंबर्डे हेदेखील अशोक चव्हाणांसोबत असल्याचं सांगितले जात आहे. त्यात माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजीनामा दिला आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर २६ आमदार तरी फुटतील, असे संकेत आहेत. त्यामुळे काँग्रेसला धक्क्यावर धक्का बसणार हे निश्चित. त्यात महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. 'आगे आगे देखिए होता है क्या' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे समजदार को इशारा ही काफी होता है.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.