राज्यसभेकरिता भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर

    11-Feb-2024
Total Views |
Bjp Candidates Rajyasabha Election 2024

नवी दिल्ली :
आगामी राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांना मान्यता दिली आहे.

बिहार राज्यातून धर्मशीला गुप्ता, डॉ. भीम सिंह यांना तर छत्तीसगड येथून राजा देवेन्द्र प्रताप सिंह, हरियाणातून सुभाष बराला, कर्नाटक राज्यातून भाजपकडून नारायण कृष्णा भांडगे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश डॉ. सुधांशु त्रिवेदी व आर पी एन सिंह, चौधरी तेजवीर सिंह, साधना सिंह, अमरपाल मौर्य, डॉ. संगीत बलवंत, नवीन जैन तर उत्तराखंड येथून भाजपतर्फे महेंद्र भट्ट व पश्चिम बंगाल येथून सौमिक भट्टाचार्य यांना भाजपकडून आगामी राज्यसभेकरिता उमेदवारी देण्यात आली आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.