कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभ! ईपीएफओ व्याजदर ' इतक्याने' वाढला.

आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे कर्मचाऱ्यांसाठी नवीन ईपीएफओ गिफ्ट

    10-Feb-2024
Total Views |
EPFO 
 
 
कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभ! ईपीएफओ व्याजदर 'इतक्याने' वाढला
 

आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे कर्मचाऱ्यांसाठी नवीन ईपीएफओ गिफ्ट
 


मुंबई: इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, चाकरमान्यांना मोठा ईपीएफओवर दिलासा मिळाला आहे. शनिवारी एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंड ऑरगॅनायझेशन (ईपीएफओ) मुदत ठेवी व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. ८.१५ टक्क्यांवरून व्याजदर ८.२५ टक्के इतका वाढला आहे. ६५ लाख ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा फायदा जाहीर करण्यात असून ८.२५ टक्के व्याजदर व्हीपीएफ फंडासाठी देखील लागू होईल.
 
यासंबंधीत संलग्न नसलेल्या संस्थांना देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा व्याजदर लागू करावा लागणार आहे. २० किंवा याहून अधिक मनुष्यबळ असलेल्या संस्थाना ईपीएफओचा हा नियम लागू असतो.
 
या नियमानुसार कर्मचाऱ्यांना स्वतः चार उत्पन्नातून १२ टक्के योगदान करणे अपेक्षित असते. कर्मचाऱ्यांचे पैसे ईपीएफओ खात्यात जमा होतात. त्याच रकमेची पुनरावृत्ती संस्थेतर्फे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खात्यात जमा होते.
 
ईपीएफ म्हणजे नक्की काय?
 
भविष्यातील तरतूदीसाठी पगारी कर्मचाऱ्यांना ही योजना बंधनकारक असते. एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंड (ईपीएफ) रक्कम संबंधित ईपीएफओ खात्यात कर्मचाऱ्यांकडून भरली जाते. पगारातील प्रति महिना १२ टक्के रक्कम या योजनेसाठी वापरली जाते. मालकी संस्था यातील ३.६७ टक्के कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करते राहिलेली ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी स्वतःसाठी खात्यात भरतो.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.