कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड

06 Dec 2024 13:24:22
 
Kalidas Kolambkar
 
मुंबई : वडाळा विधानसभेचे आमदार कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता राजभवनावर त्यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.
 
हे वाचलंत का? -  बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर संस्था आहे!
 
कालीदास कोळंबकर यांच्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. दरम्यान, दि. ७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. यावेळी सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढचे तीन दिवस कालीदास कोळंबकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. यादरम्यान ते आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0