तो खरंच पुन्हा आलाय! आता झकासपैकी टिंगल, टवाळी करत पाच वर्षे घरी बसा
चित्रा वाघ यांची पोस्ट चर्चेत
06-Dec-2024
Total Views |
मुंबई : गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत त्यांना डिवचले आहे.
चित्रा वाघ आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, "तो खरंच पुन्हा आलाय बरं का आणि मग्रूरी, मस्तवालपणा, माज, मस्ती, अराजकता, विश्वासघात, खुनशीवृत्तीवाले घरीच बसले. आता झकासपैकी टिंगल,टवाळी करत पाच वर्षे घरीच बसा," असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन' हा एक डायलॉग प्रसिद्ध असून तो सध्या माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय. यावरूनच विरोधकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका-टिपण्णी केली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी विरोधकांच्या टीकेचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.