संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींचे कामबंद आंदोलन!

तीन दिवस कामकाज बंद राहणार

    31-Dec-2024
Total Views |
 
Santosh Deshmukh
 
मुंबई : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ग्रामपंचायतींनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या आंदोलनात तीन दिवस ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  ब्रेकिंग! वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण
 
या आंदोलनात राज्यभरातील २७ हजार ९५१ सहभागी होणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत सरपंच संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. यादरम्यान, ३१ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार आहे. यवतमाळ, वाशिम, गोंदिया, भंडारा यासह अनेक जिल्ह्यातील ग्रामपंतायती या आंदोलनात सहभागी होणार आहेत.