ब्रेकिंग! वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण

    31-Dec-2024
Total Views |
 
Walmik Karad
 
पुणे : दोन कोटींच्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी ऑफिसला शरण आला आहे. शरण येण्याआधी त्याचा एक व्हिडीओ पुढे आला होता. यात त्याने आपण शरणागती पत्करत असल्याची माहिती दिली आहे.
 
"माझ्यावर केज पोलिस स्टेशनमध्ये खोटी खंडणीची फिर्यादीची दाखल झाली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी पुण्यातील पाषाण रोड येथील सीआयडी ऑफिसला शरण येत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. राजकीय द्वेषापोटी यात माझे नाव जोडले जात आहे. पोलिस तपासात या प्रकरणात मी दोषी आढळल्यास न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे," असे वाल्मिक कराडने या व्हिडीओत म्हटले आहे.
 
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले होते. वाल्मिक कराड हे या हत्येतील मास्टरमाईंड असल्याचा आरोपही विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होता. दरम्यान, वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल असून आता तो पोलिसांना शरण आला आहे.