मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलेल्या तक्रारीची माहिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, या तक्रारीचा योग्य अभ्यास करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करत असताना प्राजक्ता माळींचे नाव घेतले. यावर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला. तसेच त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे पत्र महिला आयोगाकडे दिले. रुपाली चाकणकर यांनी पोस्ट करत याविषयीची माहिती दिली.
हे वाचलंत का? - सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला विश्वातील प्रधान हरपला!
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत. काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य आणि त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करण्यासाठी शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढाकार घेईल," असे त्या म्हणाल्या.