चिपळूणमध्ये मनसेला धक्का! शहराध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

30 Dec 2024 13:39:07
 
MNS
 
रत्नागिरी : विधानसभा निवडणूकीत अपयश आल्यानंतर आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रविवार, २९ डिसेंबर रोजी चिपळूण येथील मनसेचे शहराध्यक्ष अभिनव भुरण यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणाचा ठपका ठेवत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
 
हे वाचलंत का? -  प्राजक्ता माळी 'त्या'वेळी का बोलली नाही? अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा सवाल
 
अभिनव भुरण आपल्या राजीनामा पत्रात म्हणाले की, "पक्ष वाढवण्यासाठी मी १०० टक्के प्रामाणिक प्रयत्न केले. परंतू, पक्षातील अंतर्गत राजकारण आणि प्रामाणिक सहकारी व पदाधिकाऱ्यांना मुद्दाम त्रास देऊन बाजूला करणे, या सगळ्यामुळे खूप नुकसान झाले. चिपळूण तालुक्यातून पक्ष वाढू न देता फक्त स्वत:च्या फायद्यासाठी वर्षानुवर्षे त्याचा वापर करून घेणाऱ्या लोकांमुळे आज पक्ष खूप खाली गेला आहे. याचे दु:ख कायम राहिल. यामुळे मला माझे काम करताना खूप अडचण होत असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे," असे त्यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0