प्राजक्ता माळी 'त्या'वेळी का बोलली नाही? अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा सवाल

    30-Dec-2024
Total Views |
 
Deepali Sayyad
 
मुंबई : पहिल्यांदा करूणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतले त्यावेळी ती का बोलली नाही? असा सवाल अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्याने सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली.
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, "करूणा धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा जेव्हा प्राजक्ता माळीचे नाव घेतले त्याचवेळी तिने बोलायला हवे होते. त्यावेळी ती बोलली नाही. त्यामुळे या गोष्टीला एक वेगळे वळण लागले आणि राजकीय पक्षाच्या लोकांनी तिचे नाव घेतले. याचा अर्थ मी सुरेश धस अण्णांच्या बाजूने आहे असा नाही.अण्णांनीसुद्धा हे खरे आहे की, खोटे हे बघायला हवे होते. एखाद्या सिने अभिनेत्रीचे नाव घेतल्याने आपण मोठे होऊ शकतो ही समजूत चुकीची आहे."
 
हे वाचलंत का? -  प्राजक्ता माळींच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल!
 
"प्राजक्तानेसुद्धा करूणा धनंजय मुंडेंना ठासून विचारायला हवे होते. तिने तेव्हा का विचारले नाही? ती थोडी उशीरा प्रकट झाली. ती आधी बोलली असती तो विषय तिथेच स्पष्ट झाला असता. कलाकारांचे वेगळे अस्तित्व आहे. त्यांना कुठेही बोलवले जाते. तिथे गेल्यानंतर याप्रकारे त्यांचे नाव घेणे हे चुकीचे आहे," असेही त्या म्हणाल्या.