भारतासाठीचे योगदान नेहमीच स्मरणात राहील

27 Dec 2024 12:38:40

Sarsanghchalak pays tribute to Manmohan Singh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Manmohan Singh) 
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (९२) यांचे गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्याप्रती शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश अत्यंत दु:खी झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि त्यांच्या प्रशंसकांप्रती तीव्र शोक व्यक्त करतो. प्रख्यात अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे भारतासाठीचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या दिवंगत आत्म्याला सद्गती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हे वाचलंत का? : भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान कायम स्मरणात राहील!

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर वृद्धपकाळामुळे उपचार सुरू होते. दिनांक २६ रोजी ते आपल्या घरी अचानक बेशुद्ध पडले, त्यानंतर त्यांना रात्री आठ वाजून सहा मिनिटांनी एम्स येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आपत्कालीन उपचार तत्काळ सुरू करण्यात आले, मात्र त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिले नाही आणि रात्री नऊ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचे निधन झाले, अशी माहिती एम्स तर्फे देण्यात आली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग दहा वर्षे देशाचे पंतप्रधान होते. २००४ साली काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीस बहुमत मिळाले, त्यावेळी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्यात आले. पुढे २००९ साली त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीने पुन्हा बहुमत मिळवले आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते.
Powered By Sangraha 9.0