भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान कायम स्मरणात राहील!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

    27-Dec-2024
Total Views | 83
 
Fadanvis
 
मुंबई : भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी रात्री भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण एक महान अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी गमावला आहे. १० वर्षे पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करत भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील."
 
हे वाचलंत का? -  धोरणी आणि हुशार राजकीय नेतृत्व हरपले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
 
दरम्यान, भारत सरकारने डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. २६ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ हा दुखवटा पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121