धोरणी आणि हुशार राजकीय नेतृत्व हरपले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

    27-Dec-2024
Total Views | 68
 
Shinde
 
मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार अर्थतज्ञ आणइ राजकीय नेतृत्व हरपले, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी रात्री डॉ. मनमोहन सिंह नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात यांचे निधन झाले.
 
 
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 'X' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ. मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश निर्गमित

ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश निर्गमित

ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसाहक्काने महापालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश आज प्रशासनाने निर्गमित केल्याने सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून प्रलंबित वारसा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121