लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता

24 Dec 2024 13:16:43
 
Ladki Bahin
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत एक मोठी बातमी पुढे आली आहे. लाडक्या बहिणींची प्रतिक्षा आता संपली असून आजपासून (मंगळवार) डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मानली जात आहे.
 
सोमवार, २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली होती. येत्या सात ते आठ दिवसांत लाडकी बहिण योजनेचा हप्ता देणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता आजपासूनच डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे.
 
हे वाचलंत का? -  सप्तश्रृंगी देवीच्या गडावर वक्फचा दावा : मंत्री नितेश राणे
 
आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात एकूण साडे सात हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यानतंर आता आठवडाभरात महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत. पहिल्या टप्त्यात ३५ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0