ज्यांनी मिळवून दिले स्वातंत्र्य, त्यांच्याच गळ्यात 'चपलांचा हार'

23 Dec 2024 15:46:27

Bangladesh Swatantrya Sainik

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Swatantrya Sainik)
बांगलादेशात हिंदूंवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अत्याचार होत आहेत. आधी बांगलादेशी चलनांवरून शेख मुजिबुर रहमान यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेत युनुस सरकारने बांगलादेशच्या राष्ट्रपित्याचा अपमान केला होता. त्यानंतर आता कट्टरपंथींनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही टार्गेट केल्याचे निदर्शनास आले आहे. १९७१ च्या युद्धातील स्वातंत्र्यसैनिक अब्दुल है कानू यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांना अपमानित केल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे.

संबंधित व्हिडिओ शेअर करत अवामी लीगने लिहिले की, 'स्वातंत्र्य संग्रामात सेवा बजावलेल्या अभिमानी स्वातंत्र्यसैनिक अब्दुल है कानू यांचा चपलांचा हार घालून अपमान करण्यात आला आहे. हे निंदनीय कृत्य केवळ एखाद्या व्यक्तीवर हल्ला नाही तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या मूल्यांवर आणि आपल्या स्वातंत्र्ययुद्धातील वीरांच्या सन्मानावर हल्ला आहे. आपल्या युद्धवीरांविरुद्धच्या अशा घृणास्पद कारवाया सहन केल्या जाऊ शकत नाहीत. बांगलादेशच्या प्रतिष्ठेवर आणि इतिहासावर हा थेट हल्ला आहे आणि आपण त्याविरोधात उभे राहिले पाहिजे.

Powered By Sangraha 9.0