मध्यप्रदेश : बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदु अत्याचाराचा मध्य प्रदेश राज्यातील बुरहानपूर मध्ये चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला गेला. संस्कार भारती तर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो कलाकारांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन लाइव पेंटिंगच्या माध्यमातून आपला विरोध व्यक्त केला.
बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदुंवर होणारे अत्याचार, तेथील मंदिरांची होणारी विटंबना, हत्या, महिलांवर होणारे बलात्कार अशा अनेक गोष्टींचे वर्णन आपल्या चित्रांमधून करत चित्रकारांनी आपल्या भावना आणि विरोध व्यक्त केला. राज्यभरातून हजारो कलाकार या प्रदर्शनात सहभागी झाले होते.