अणुऊर्जा विभागाचा टायटॅनियम स्लॅग उत्पादनासाठी करार; परकीय चलन गंगाजळी वाढणार!

05 Nov 2024 18:15:26
titanium slag production in india


मुंबई : 
    केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभाग अंतर्गत इंडियन रेअर अर्थ इंडिया लिमिटेडने भारतात टायटॅनियम स्लॅग उत्पादनासाठी करार केला आहे. अणुऊर्जा विभागाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी(सीपीएसई) व उस्त कामेनोगोर्स्क टायटॅनियम व मॅग्नेशियम प्लांट (यूकेटीएमपी जेएससी) कझाकस्तान यांनी आयआरईयूके टायटॅनियम लिमिटेड ही भारत कझाक संयुक्त उपक्रम कंपनी(जेव्हीसी) स्थापन करण्यासाठी करार केला.




करारावर इंडियन रेअर अर्थ लिमिटेड (आयआरईएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपेंद्र सिंग व यूकेटीएमपी जेएससी च्या अध्यक्ष असीम मामुतोवा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी भारत व कझाकस्तान चे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. या संयुक्त उपक्रमामुळे कमी प्रतीच्या इल्मेनाईटयुक्त कच्च्या मालापासून चांगल्या प्रतीचे टायटॅनियम तयार करण्यासाठी भारतात टायटॅनियमची व्हॅल्यू चेन विकसित होणार आहे.

तसेच, ओडिशा राज्यात रोजगारनिर्मितीही होऊन यूकेटीएमपी जेएससीशी झालेल्या सहमतीमुळे देशाची परकीय चलन गंगाजळी वाढीस लागणार आहे. यूकेटीएमपी जेएससीला कच्च्या मालाचा खात्रीलायक स्रोत मिळणार असून आयआरईएल व यूकेटीएमपी जेएससी यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे दोन्ही कंपन्यांची बाजारातील पत वाढेल. कझाकस्तान व भारत या दोन्ही देशांच्या टायटॅनियम व्हॅल्यू चेन मध्ये विकास होण्यास मदत होईल.
 

 
Powered By Sangraha 9.0