टाटा मोटर्सने घेतला मोठा निर्णय, 'या' लक्झरी कारची विक्री बंद करणार!

04 Nov 2024 15:18:20
tata-motors-stopped-electric-production


मुंबई :      टाटा मोटर्स मालकीची कंपनी जगुआरने मोठा निर्णय घेतला असून ब्रिटनमध्ये कंपनीने जगुआर कारची विक्री बंद केली आहे. इलेक्ट्रिक ब्रँड बनविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असताना कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कंपनी २०२६ पर्यंत कारचे कोणतेही नवीन मॉडेल विकणार नाही, असेही निश्चित करण्यात आले असून कंपनीकडून आतापर्यंत नवीन कार सादर करण्यात आलेली नाही.




दरम्यान, मागील महिन्यांत टाटा मोटर्स आता यूकेमध्ये आपला व्यवसाय वाढविणार असल्याचे बोलले जात होते. त्याचबरोबर, कंपनीने जग्वार लँड रोव्हर इलेक्ट्रिक कारचा पुरवठा करण्यासाठी यूकेमध्ये बॅटरी फॅक्टरी तयार करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. टाटाने सॉमरसेट, पश्चिम इंग्लंडमधील एक साइट निवडल्याचे बोलले गेले होते. साईट सलमांका ग्रुपच्या मालकीची असून रिअल इस्टेटमध्ये मूळ असलेला गुंतवणूक व सल्लागार व्यवसाय आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ब्रिटिश ब्रँडची भारतीय मूळ कंपनी जगुआर आठवड्यात लवकरात लवकर निर्णय घेऊन युके इलेक्ट्रिक Jaguar Land Rover बॅटरी प्लांटबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर आता कंपनीकडून संपूर्ण इलेक्ट्रिक ब्रँड बनण्याच्या चर्चा सुरू असतानाच ब्रिटनमध्ये कंपनीने जगुआर कारची विक्री बंद केली आहे.







Powered By Sangraha 9.0