सणासुदीच्या हंगामात इलेक्ट्रिक वाहनविक्रीस बूस्टर; ऑक्टोबरमध्ये विक्रमी विक्रीची नोंद!

04 Nov 2024 13:45:47
ev-market-picks-up-pace-during-festive-season


मुंबई : 
    सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक वाहन(ईव्ही) मार्केटने वेग घेतला असून ऑक्टोबरमध्ये विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे. देशातील सणासुदीच्या हंगामाने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील घसरणीचा कल अखेर उलटविला आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण ईव्ही नोंदणी आकडेवारी २,१७,७१६ वाहनांवर पोहोचली आहे. मागील महिन्यातील सप्टेंबरमधील विक्रीपेक्षा ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.




दरम्यान, ऑक्टोबरमधील इलेक्ट्रिक वाहनांची मासिक विक्रीही सर्वाधिक आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील घसरण थांबली आहे. तथापि, इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा आकडा मार्चच्या तुलनेत जास्त असून २,१३,०६३ वाहनांची विक्री झाली होती. मार्चमधील भारतातील (हायब्रीड आणि) इलेक्ट्रिक वाहनांचे फास्टर ॲडॉप्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग अर्थात (FAME-2) योजनेच्या शेवटच्या दिवसांतील विक्रीतून ईव्हीलाही चालना मिळाल्याचे दिसून आले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये दुसऱ्यांदा इलेक्ट्रिक वाहनांच्या मासिक विक्रीने २ लाख वाहनांचा आकडा पार केला. मात्र, यंदा मागणी किती वाढली आहे, हे ऑक्टोबरच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. २०२४ मध्ये दुसऱ्यांदा इलेक्ट्रिक वाहनांच्या मासिक विक्रीने २ लाख वाहनांचा आकडा पार केला. यासह, इलेक्ट्रिक वाहनांची एकूण नोंदणी १६ लाखांच्या पुढे गेली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत दुचाकी सर्वात मोठी श्रेणीत एकूण ९,५४,२४१ वाहने विकली गेली.







Powered By Sangraha 9.0