पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली!

04 Nov 2024 12:47:37
 
Rashmi Shukla
 
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधकांकडून वारंवार त्यांच्या बदलीची मागणी करण्यात येत असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांची बदली कोणत्या ठिकाणी केली याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
 
रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांकडून वारंवार आरोप करण्यात येत होते. तसेच त्यांच्या बदलीचीही मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आता निवडणूकीच्या तोंडावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रश्मी शुक्ला यांचा पदभार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार आहे.
 
हे वाचलंत का? -  "...तर मी माहिममधून माघार घेणार"; सदा सरवणकरांचं विधान
 
यासोबतच तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे एक पॅनल तयार केले जाणार असून या पदासाठी नव्या नावाचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल मुख्य सचिवांकडे सोपवण्यात येणार आहे. त्यानंतर ते हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवतील.
 
 
 
Powered By Sangraha 9.0