मुंबई : काँग्रेस नेते आणि चांदिवली मतदारसंघाचे उमेदवार नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नसीम खान यांच्या कार्यालयात दोन संशयित आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्या मोबाईलमध्ये काही चॅट आणि कोडवर्ड सापडले होते. त्यामुळे नसीम खान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - "वंचितला जास्त संख्याबळ मिळाले तर आम्ही..."; प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले आणि आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, अशातच नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नसीम खान यांच्याबाबतीत मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. नसीम खान यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.