उघडा डोळे, बघा नीट! सज्जाद नोमानींचा व्हिडीओ ट्विट करत आशिष शेलारांचे जनतेला आवाहन

15 Nov 2024 19:40:51
 
Ashish Shelar
 
मुंबई : ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ शेअर करत 'उघडा डोळे, बघा नीट' असे आवाहन जनतेला केले आहे. तसेच एक है तो सेफ है, या घोषणेचाही त्यांनी उल्लेख केला.
 
 
 
आशिष शेलार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सज्जाद नोमानी यांनी 'हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,' असे वक्तव्य केले. यावरून आशिष शेलार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. 'एक ऐसा व्होट जिहाद करो जिसके सिपेसालार शरद पवार है और अझीम सिफाही उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटौले है," हे सज्जाद नोमानी यांचे विधान पोस्ट करत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
 
हे वाचलंत का? -  मविआच्या काळात गेलेला महाराष्ट्राचा गौरव परत आणणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे आश्वासन
 
दरम्यान, ऑल इंडिया उलेमा बोर्डाने १७ मागण्यांसह महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आता ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीच्या २६९ उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0