मुंबई : शरद पवारांचा तुतारी पक्ष हा मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का? असा सवाल भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना गणपती बाप्पाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून नितेश राणेंनी शरद पवार गटावर निशाणा साधला आहे.
नितेश राणे म्हणाले की, "हिंदूंचे खरे विरोधक मुस्लीम नसून हिंदूच आहेत. शरद पवार साहेब उपस्थित असलेल्या व्यासपीठावर या वक्तव्याची परत परत आठवण होते. याआधीही ज्या व्यासपीठावर शरद पवार उपस्थित होते तिथे ज्ञानेश्वर महाराव नावाच्या व्यक्तीने हिंदू देवी-देवतांचा अपमान केला होता. त्यानंतर आता इंदापूरच्या व्यासपीठावरही उत्तम जानकर यांनी गणपती दारू पितो, अशा शब्दात देवीदेवतांचा अपमान केला आहे."
हे वाचलंत का? - हरियाणात भाजपची आघाडी! जम्मू काश्मीरचं चित्र काय?
"त्यामुळे तुतारी पक्ष हा मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का? ज्याप्रमाणे मुस्लीम लीग हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात, तशीच भूमिका वारंवार तुतारीच्या व्यासपीठावर दिसली आहे. गणपतीच्या आक्षेपार्ह विधानावर शरद पवार किंवा तुतारीचा कुठलाच नेता आक्षेप घेत नसेल तर महाराष्ट्रात तुतारी चिन्ह असलेला पक्ष मुस्लीम लीगचं काम करत आहे का?" असा सवाल त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना केला आहे.