चंदीगड : जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचे निकाल पुढे येत आहेत. दरम्यान, हरियाणामध्ये भाजपने आघाडी घेतली असून आतापर्यंत ५० जागांचा आकडा गाठला आहे. तर काँग्रेस आतापर्यंत ३४ जागांवर आघाडी घेतली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सध्या काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी सध्या काँग्रेसने ५० जागांचा आकडा गाठला आहे. तर भाजप २५, पीडीपी ५ आणि इतर पक्ष ९ जागांवर असल्याचं चित्र आहे. या दोन्ही राज्यातील निकाल थोड्या वेळात स्पष्ट होईल. मात्र, सध्या दोन्ही ठिकाणी अटीतटीचं चित्र दिसत आहे.