गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ऑटोमोबाईल कंपनीने 'तो' निर्णय घेतला मागे

07 Oct 2024 17:24:46
auto sector company ipo offer withdrawn


मुंबई :      ऑटो क्षेत्रातील कंपनी हिरो मोटर्स कंपनीने मोठा निर्णय घेतला असून गुंतवणूकदारांची संधी यामुळे हुकणार आहे. हिरो मोटर्स ९०० कोटी रुपये आयपीओ लाँच करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस(डीआरएचपी) परत घेतला आहे. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)च्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती प्रसृत करण्यात आली आहे.




दरम्यान, दि. २८ ऑगस्ट रोजी सेबीकडे दाखल केलेला डीआरएचपी दस्तावेज दाखल केला होता. त्यानंतर आता हीरो मोटर्सने आयपीओसाठी दाखल केलेला दस्तावेज मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून कर्जाची परतफेड करण्यासाठी, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि इतर उद्देशांसाठी बाजार भांडवल निर्मिती करायची होती.

कंपनीच्या डीआरएचपीमध्ये अंतर्भूत माहितीनुसार, आयपीओ अंतर्गत नवीन इश्यू म्हणजेच ५०० कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जाणार होते. त्याचबरोबर, कंपनी प्रवर्तकांना ४०० कोटी रुपयांच्या शेअर्सची ऑफर फॉर सेल(ओएफएस) प्रस्तावित होती. यात मुंजाल होल्डिंग्सने २५० कोटी, भाग्योदय इन्व्हेस्टमेंट्स आणि हिरो सायकल्सने प्रत्येकी ७५ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर प्रस्तावित होते.






Powered By Sangraha 9.0