पोलाद निर्मितीत कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर; सरकारी कंपनीने केला करार
07-Oct-2024
Total Views | 30
मुंबई : भारत सरकारच्या महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक असलेली स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड(सेल) आणि बीएचपी ग्रुप लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांनी पोलाद निर्मितीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
सेलने सांगितले की, त्यांनी कमी उत्सर्जन पोलाद उत्पादन तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी जागतिक संसाधन कंपनी ऑस्ट्रेलियास्थित बीएचपीसोबत करार केला असून स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड(सेल)ने एका निवेदनात म्हटले की, दोन्ही कंपन्यांनी पोलाद निर्मितीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
दरम्यान, भारतात ब्लास्ट फर्नेस पद्धतीद्वारे कमी कार्बन आधारित पोलाद निर्मिती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी उभय कंपन्यांत सहकार्याच्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध धोरणांचे मूल्यांकन करण्यासाठी प्राथमिक अभ्यास दोन्ही कंपन्या करतील. याशिवाय सेलच्या एकात्मिक स्टील प्लांटमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.