मुंबई : मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात सभेचे आयोजन केले. या सभेत आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे ३ हजार रुयपे करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठविल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गुलाबराव पाटील यांची जळगावात सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, निवडणुकांमुळे महिलांच्या खात्यात पैसे आल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत, आदमी बेईमान हो जायेगा मगर मेरी बहन बेईमान नही होगी, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी लोकांना पंढरपूरला नेलं. तुम्ही कमीत कमी वणी गडावर किंवा मनुदेवीच्या मंदिरावर तरी न्या. नुसतं भाषण करून चालत नाही तर करून दाखवावं लागतं. स्वतःला पोरगं झालं ते चांगलं आणि दुसऱ्याला पोरगं झालं ते काळं नकट अशा पद्धतीचा विरोधकांचा विचार आहे, अशी घणाघाती टीका गुलाबराव पाटील यांनी केली. तसेच, जिथे चांगलं काम होतं त्या कामाला वाईट म्हणणं हाच विरोधकांचा धंदा असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला.