निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

    06-Oct-2024
Total Views |
police-inspectors-transfer-after-central-election-commission-advise


मुंबई :
   राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठकदेखील घेत चर्चा केली. त्यानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १११ पोलिसांच्या तातडीने बदल्या सरकारने केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.




दरम्यान, विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. आयोगाच्या सूचनेनुसार मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर तर यापैकी सर्वाधिक अधिकाऱ्यांची ठाणे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ३ दिवसीय दौऱ्यानंतर राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ३ वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशी सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केली होती. या सूचनेचे पालन करत सरकारने तब्बल १११ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे.