पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय; टीम इंडियाची एक संधी हुकली, जाणून घ्या

06 Oct 2024 20:36:37
india womens won


मुंबई :    महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने विजयाचे खाते उघडले आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयानंतर आगामी सामन्यात देखील विजय मिळवावा लागेल. महिला विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर १०६ धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान चार विकेट्स गमावत पूर्ण केले. श्रीलंकेविरुध्द पहिल्या सामन्यात पराभवानंतर टीम इंडियाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.


 
 
दरम्यान, टीम इंडियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ५० पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे या सामन्यात झटपट लक्ष्य पूर्ण करुन नेट रनरेट सुधारण्याची संधी होती. मात्र, ही संधी टीम इंडियाने गमावली आहे. त्यामुळे आगामी सामन्यात दमदार कामगिरीची अपेक्षा टीम मॅनेजमेंटला असणार आहे.
 
टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना अरुंधती रेड्डी (३ विकेट) आणि श्रेयंका पाटील (२ विकेट) यांनी चमकदार कामगिरी केली. सलामीवीर शेफाली वर्माच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने सामना जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. टीम इंडियाचा पुढील सामना ०९ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुध्द होणार आहे.





Powered By Sangraha 9.0