नाशिक मध्य विधानसभेत काँग्रेसमध्ये बंडखोरी! हेमलता पाटील यांचा अपक्ष लढण्याचा नारा
25-Oct-2024
Total Views |
नाशिक : नाशिक मध्य विधानसभेत काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही जागा उबाठा गटाला मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या काँग्रेस नेत्या हेमलता पाटील नाराज असून त्यांनी अपक्ष लढण्यारा नारा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना हेमलता पाटील म्हणाल्या की, "गेली ५ वर्ष मी या मतदारसंघात पक्षासाठी काम करते. नाशिक शहरात चार मतदारसंघ आहेत. यापैकी एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार नाही. ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत. अजूनही वेळ आहे. पक्षाने एबी फॉर्म दिल्यास आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. परंतू, पक्षाने एबी फॉर्म दिला नाही तर मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे," असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, "तिकीट वाटपाच्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजतापर्यंत मी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांसोबत होते. ही जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं त्यांनी मला सांगितलं. पण मी तिथून बाहेर पडल्यावर ५ मिनिटांत उबाठा गटाच्या उमेदवाराला एबी फॉर्म दिल्याचं मला कळलं," असेही त्या म्हणाल्या.